!! विवाह संस्कार विभाग !!

१३ एप्रिल ते १५ एप्रिल २००२ या कालावधीत नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने भव्य मानवकल्याण व राष्टहीत मेळावा संपन्न झाला होता. या तीन दिवसांच्या मेळाव्यात सेवामार्गाच्या वतीने अनेक तज्ञांनी विविध विषयांवर नागरीकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या निमित्ताने काही नवे प्रयोग सुद्धा करण्यात आले. लोकांच्या त्या उपक्रमाला प्रचंड उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे विवाह नोंदणी. विवाहेच्छुक मुलामुलींच्या नाव नोंदणीच्या विभागास प्रचंड प्रतिसाद लाभला व त्यापैकी अनेक विवाह संपन्नही झाले. तेव्हापासून नावारूपास आले आहे. येथे विविध विषयांवर सातत्याने संशोधन चालू असते व या संशोधनातूून त्या त्या गोष्टीचा समाजाच्या उद्धारासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. वर उल्लेख केलेल्या विषयांपुरताच हा विभाग नसून श्री गुरूपीठावर शेती, आयुर्वेद, आरोग्य, याज्ञिकी, बालसंस्कार, विवाह मंडळ, कायदेशीर सल्लामसलत, मराठी अस्मिता, स्वयंरोजगार अशा विविध विषयांवर सातत्याने प्रशिक्षण शिबिरे,चर्चासत्र, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. या सर्व गोष्टींमुळे श्री गुरूपीठ सातत्याने गजबजलेले असते.

दिवाळी वउन्हाळयाच्या सुटटयांमध्ये बाल व युवासंस्कार शिबीराचे आयोजन न चुकता श्री गुरूपीठात होत आहे. ग्राम अभियानातील गावातील विार्थ्यांचा, पालकांचा शिक्षकांचा सहभाग मिळवायचा असेल तर या सर्वांना श्री गुरूपीठावरील शिबिरात सहभागी करून घ्यावे. संख्या मोठी असल्यास त्या गावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात अथवा परिसरातील केंद्रात शिबिराचे आयोजन करता येईल. अशाच प्रकारे शेती, आरोग्य, आयुर्वेद, याज्ञिकी, विवाह मंडळ, मराठी अस्मिता, स्वयंरोजगार ज्या ज्या विषयात ज्यांना ज्यांना रस असेल अशा सेवेकरी व नागरीकांची वेगवेगळी यादी बनवून त्यांना प्रशिक्षण देता येईल .

आपण ज्या गावात हे अभिनव अभियान राबवीत आहोत त्या गावातील सरपंच, उपसरपंच प्रमुख नागरिकांना सेवामार्गाच्या मासिक बैठकीच्या निमित्ताने श्री गुरूपीठावर बोलावले तर त्यांना कार्याची व्यापकता व दिशा कळेल आणि ते दुप्पट वेगाने कामाला लागतील व आपले काम सोपे होईल. प्रशिक्षण विभाग म्हणजे ज्ञानदाना बरोबरच प्रात्यक्षिकांसह विषयाची सखोल माहिती देणारा विभाग आहे म्हणूनच हा एक महत्वाचा विभाग असून त्यांसमोर आव्हात्मक काम आहे.

!! वास्तुशास्त्र विभाग !!

कुटुंबातील वा घरातील सुख, समाधान हे त्या घराच्या रचनेवर अवलंबून असते. गावाची संपन्नता, सुख, समाधान हे सुद्धा गावाच्या रचनेवर अवलंबून असते. गावाची रचना वास्तुशास्त्रानुसार असेल तर ते गाव निश्चित सर्वदृष्टीने संपन्न असते.ग्रामअभियानात वास्तुशास्त्र विभागात काम करणा-या वास्तुतज्ञांनी गावात जावून गावातील प्रमूख नागरिकांना विश्वासात घेवून ग्रामरचना, मंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय, सहकारी संस्था कार्यालय, शाळा, विहिरी पाणवठा, समाज मंदिरे, गावातील खळी अशा गोष्टींची पाहणी करावी. शेतक-यांना विशेषतः शेतीबाबत वास्तुशास्त्रदृष्टयाही मार्गदर्शनाची अत्यंत गरज असल्याचे लक्षात ठेवून ते करावे. अर्थात चुकीच्या वास्तुबाबत पर्याय सूचवावेत. गावक-यांना वैयक्तिकरित्या म्हणजे त्यांच्या घराची रचना कशी असावी याबाबत ढोबळमानाने मार्गदर्शन करावे. आपण सुरवातीसच वास्तुशास्त्राबाबत विस्तृत चर्चा केली किंवा बारीक सारीक माहिती देण्याचा प्रयत्न केला तर या बाबत आतापर्यंत अनभिज्ञ असणा-या गावक-यांच्या मनात गोंधळ होवू शकतो.

पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व ईशान्य, आग्रेय, वायव्य, नैऋत्य या दिशांना कोठे काय असावे. हे सांगा उदा. आग्रेयेस स्वयंपाकघर, ईशान्येस देवघर, वायव्येस बैठक, नैऋत्येस मालकाचे शयनगृह असावे. आग्रेय व नैऋत्य यांच्या मध्यभागी म्हणजेच दक्षिणेस संडास पूर्वेच्या भिंतीस स्नानगृह, उत्तरेस तिजोरी, पश्चिमेस हवा असल्यास ओटा अशी ढोबळ माहिती ावी. पूर्व ही इंद्राची, आग्नेय ही दिशा अग्रीची, दक्षिण यमराजाची, नैर्ऋत्य निर्ऋतिची पश्चिम वरूणाची वायव्य वायुदेवाची, उत्तर कुबेराची तर ईशान्य ही दिशा साक्षात भगवान शिवाची दिशा आहे. या प्रमाणे त्या त्या दिशेवर त्या देवांचे अधिपत्य असते. वास्तु बांधतांना ही गोष्ट लक्षात घेवूनच रचना करावी.

शेतीचे उत्पन्न वाढीसाठी, जनावरे उत्तम रहावीत म्हणून शेतीची, गोठयांची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना कशी करावी हे मार्गदर्शन ग्रामअभियानांतर्गत वास्तुतज्ञांनी करणे अपेक्षित आहे. खेडयात शेतीप्रमाणेच छोटे-मोठे उदयोग करणारे अनेक व्यापारी असतात. त्यांनाही अनेक अडचणी असतात. त्यांना आपल्या दुकानाची, व्यापाराची जागा याची रचना कशी करावी याबाबत मार्गदर्शन करावे लागणार आहे. अर्थातच श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान असल्याशिवाय अपेक्षित यश लाभणार कसे म्हणूनच अध्यात्मिक सेवेची जोड असायलाच हवी.

!! प्रश्नोत्तर !!

श्री स्वामी समर्थ सेवामार्ग वेगाने प्रसार पावत आहे. दररोज देशभरातून हजारो नवे सेवकरी नव्याने महाराजांच्या चरणी लीन होत आहेत. सेवामार्गाच्या प्रसाराचा हा जो वेग आहे. तो टिकून राहण्यामागील व वाढण्यामागील जी कारणे आहेत त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे प्रश्नोत्तरे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून रोज हजारोंच्या समस्या सुटत असून रोज हजारो नवे लोक प्रश्न, समस्या घेवून सर्व केंद्रांवर येत आहेत. ग्रामअभियानात या विभागाचा अर्थातच समावेश आहेच. लोकांचे प्रश्न सुटले तर ते आपोआपच अभियानात व सेवामार्गात स्थिरावणार आहेत. हे पक्के लक्षात ठेवावे.

आपल्याकडे येणारा माणूस नवीन आहे. त्याला पेलवेल तो सहजपणे करू शकेल अशा सेवेने सुरूवात करा, त्याला खूप सेवा दिली तर त्याच्या मनात गोंधळ होतो व त्याच्याकडून सेवा होणार नाही. श्री स्वामी चरित्र सारामृत रोज ३ अध्याय, ११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्रजप, गायत्री, नवार्णव, महामृत्यंजय मंत्र, शिवमहिम्न, कालभैरवाष्टक अशी सेवा देवून त्याची मनस्थिती ओळखून श्री गुरूचरित्राबाबत सांगावे, कुलदेवी, कुलदेवतेबाबत सांगावे. आज सर्वांसमोर पुत्रप्राप्ती,संतती, विवाह, आरोग्य शिक्षण रोजगार, शेती, व्यापार, मनःशांती, कर्ज, व्यसने, पतीपत्नीतील वाद, बडतर्फी, प्रमोशन, कोर्ट कचेरी, वृद्धापकाळ, अध्यात्मात प्रगती, परदेश गमन, गंभीर संकटे, शत्रुंपासून पीडा, अशा विविध समस्या प्रश्न आहेत या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून प्रश्नोत्तर करणा-या सेवेक-याने प्रश्नोत्तर करावेत.

ग्रामअभियानात प्रश्नोत्तरे करणा-या सेवेक-यांनी लक्षात ठेवावे की महाराज तुमच्या नेहमी पाठिशी असतात. महाराजच हे कार्य करीत असतात. याची जाणीवही सारखी ठेवावी, ज्यावेळी प्रश्नोत्तर करणारा एखादा सेवेकरी प्रश्न विचारणा-याच्या एखाा जटील प्रश्नाने गोंधळून जातो त्यावेळी त्या सेवेक-याची महाराजांचे चरणी पूर्ण शरणागती व श्रद्धा असेल तर महाराजांचे स्मरण करताच कार्यक्रम सुचतो. सेवेकरी फक्त निष्ठावान सदाचारी असावा. थोडक्यात मी नाही हे काम महाराजच करतात अशी भूमीका सेवेक-याची असेल तर सेवेकरीही सेवामार्गात प्रगती करतो आणि जनतेचे प्रश्नही सुटतात. ग्रामअभियानासाठी आपण जेव्हा गावात जावू तेव्हा एखाा मंदिरात वा सार्वजनिक ठिकाणी प्रश्नोत्तरे करावीत. पुढील मार्गदर्र्शनासाठी दिंडोरी दरबारात बोलवावे.

!! याज्ञिकी विभाग !!

काही वर्षांपूर्वी आपल्या गावातील वातावरण कसे निकोप, निरागी होते. शरीराप्रमाणे मनानेही निरागी असल्याने गावातील वातावरणच अत्यंत प्रसन्न असायचे, ग्रामस्थ, स्त्री पुरूष एकमेकांच्या दुःखाच्या प्रसंगी मनःपूर्वक सहभागी व्हायचे. जातपात कोठेही आड येत नव्हती. गावागावात किर्तन, भजन, हरिनाम सप्ताह, सण वाराच्या निमित्ताने सर्व स्त्री पुरूष, मुलीबाळी एकत्र येऊन मनसोक्त आनंद लूटायचे पण आज गावागावात काय परिस्थिती आहे? वर वर्णन केलेले वातावरण आज स्वप्न बनले आहे.

आज मानवातील घराघरातील दरी वाढतच आहे. गावातील ते एकीचे, निकोप, प्रसन्नतेचे वातावरण कोठेही दिसत नाही. गावात गटातटाचे, जातीपातीचे राजकारण आज चालू आहे. ग्रामपंचायती तसेच विविध कार्यकारी सोसायटी, मार्केट कमेटी, साखरकारखान्यांच्या निवडनुकांमुळे माणसामाणतील अंतर इतके वाढले आहे की, ही माणसे आता कधीच एकत्र येणार नाहीत का ? असा प्रश्न कायम मनाला भेडसावतो.

गावागावात असे रोगट वातावरण का निर्माण झाले या मागची अदृष्य कारणे मात्र कुणाच्याही लक्षात येत नाहीत आणि ती शोधण्याचा कुणी प्रयत्नही करीत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामअभियानातील याज्ञिकी विभागाला खूपच महत्वाचे काम करायचे आहे.

गावागावात हे जे उदासीन वातावरण तयार झाले आहे, त्या मागील प्रमुख कारण म्हणजे गावागावातील ग्रामदैवतांची दुरावस्था. गावाचे संरक्षण करणा-या देवतांची दुरावस्था झाल्याने ही संरक्षक देवता गावाचे रक्षण कसे करणार ? गावातील मंदिरांना भेटी दिल्या तर लक्षात येईल की मंदिरे जीर्ण होऊन त्यांची पडझड झाली आहे. मंदिरातील देवांच्या मूर्ती भग्र पावल्या आहेत, त्यांना तडे गेले आहे, मूर्तीचे हात, पाय, कान, नाक खराब झाले आहेत. भग्र मूर्तीचे विसर्जन करून नव्या मूर्तीची स्थापणा करणे, शक्य झाल्यास मंदिराचा जीर्णोद्धार करणे ही प्रमुख जबाबदारी याज्ञिकी सेवेक-यांवर आहे. अर्थात ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. यासाठी प्रथम सर्व गावक-यांची मनाची तयारी करून घेणे गरजेचे आहे व यानंतर आर्थिक नियोजन करावे लागेल. अर्थात सेवेकरी हा विधी जरी मोफत करणार असेल तरी लागणारा थोडाफार खर्च हा गावक-यांमधूनच उभा राहिल्यास या निमित्ताने प्रत्येक ग्रामस्थाचा सहयोग या अभियानास लागणार आहे.

अभियान राबविणा-या या याज्ञिकी सेवेक-यांनी प्रथम सरपंच व प्रमुख नागरिकांना या गोष्टीचे महत्व समजावून सांगावे व त्यांच्या माध्यमातून सर्व गावक-यांना अभियानात सामावून घ्यावे. ज्या ज्या गावात हा प्रयोग राबविण्यात आला तेथे खूपच चांगला परिणाम दिसुन आला आहे.ज्या ज्या गावात मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच भग्न मूर्तींचे विसर्जन करून नव्या मूर्तींची स्थापना करण्यात आली त्या त्या गावातील एकोपा वाढून नागरीक पुन्हा झाले गेले विसरून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावातील हे वातावरण कायम टिकावे म्हणून तेथे ग्रामस्थांना श्रीस्वामी समर्थ महाराजांची सेवा समजावून सांगणे, ती सेवा त्यांच्या कडून करून घेणे याबरोबरच कुलधर्म, कुलाचार यांची माहिती देणे, गावातील इतर अडचणी संकट यावर सेवा देणे, पंचमहायज्ञा सारख्या छोटया छोटया गोष्टी ग्रामस्थांना समजावून सांगणे, त्या केल्यानंतर त्यापासून मिळणा-या फायदयांची माहिती देणे, यज्ञ- याज्ञिकी पूजापाठ, याबाबत माहिती देणे, तसेच घरातील देव, देव्हारा याबाबत सुद्धा माहिती देणे अशा गोष्टी याज्ञिकी सेवेक-यांकडून अपक्षित आहेत.

घरातील देव, देव्हारा याबाबत सुद्धा गावक-यांमध्ये प्रचंड अज्ञान आहे. या साध्या सोप्या पण अत्यंत महत्वाच्या बाबी कुणीही सांगणार नसल्याने ते काम सुद्धा आपल्यालाच करावे लागणार आहे. अर्थात या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, श्री गुरूपीठाचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याची संधी सुद्धा आपल्याला मिळणार असल्याने या संधीचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग जे मानवकल्याण व राष्टकल्याणाचे कार्य करीत आहे ते या निमित्ताने जनतेपर्यंत पाहचवून जास्तीत जास्त लोकांना सुखी करायचे आहे, ही गोष्ट लक्षात ठेवावी. अधिक माहितीसाठी दिंडोरी दरबारशी संपर्क साधावा

!! मराठी संस्कृती मराठी अस्मिता !!

आपल्या ग्रामअभियानातील मराठी अस्मिता, मराठी संस्कृती हा ग्रामीण भागाच्या दृष्टीने एक महत्चाचा विभाग आहे. आज मराठी अस्मिता, मराठी संस्कृती जी काही थोडयाफार प्रमाणात टिकून आहे ती ग्र्रामीण भागामुळेच, ही गोष्ट या विभागात काम करणा-या सेवेक-यांनी लक्षात घ्यायला हवी. आजच्या अत्यंत विपरीत निराशाजनक परिस्थितीत सुद्धा तमाम मानव जातीला मार्गदर्शन करण्याची ताकद, समर्थता फ क्त भारतीय संत, महात्मे,थोर पुरूषांच्या कार्यातच आहे. हे समर्थ आदर्श कार्य मराठी भूमीतच घडले आहे. परंतू अध्यात्मास फ क्त सोवळयापूरतेच मर्यादित केल्याने अम्हाला अध्यात्म, हिंदु संस्कृतीचा विसर पडून धर्माविषयी अज्ञान वाढले आणि अंधश्रद्धा फोफावत गेल्या. कुलधर्म, कुलाचाराचाही आम्हास पुर्णपणे विसर पडला त्यातच मोगल, इंग्रजांच्या सत्तेमुळे विचारहीनता वाढली यातून काही स्वयंघोषीत विदवान तयार झाले आणि त्यांनी स्वतःला विज्ञानाचे पाइक म्हणत अध्यात्म, धर्मावर टिकास्त्र सोडले. विज्ञानयुग आले, माणुस स्वतःला भौतीक सुखात हरवून बसला, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, कुलधर्म, कुलाचार सण- वार व्रत वैकल्याशी आमचा जणू काही संबंधच उरला नाही. ही भयानक परिस्थिती सदगुरू मोरेदादांच्या लक्षात आली. सदगुरू पिठले महाराजांच्या आशीर्वादाने मराठी अस्मिता व हिंदु धर्मास नवचैतन्य देण्याची अवघड जबाबदारी प.पू. दादांनी आपल्या शिरावर घेतली.

सण- वार- व्रत- वैकल्य हे मराठी संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे. ग्रामअभियानासाठी आपण ज्या गावात जाल तेथे या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील हजारो केंद्रावर व जेथे श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे कार्यक्रम असतील तेथे आमच्या महिला सेवेकरी या प्रदर्शन मांडून सर्वांना या विषयाची माहिती देतात. या प्रदर्शनात गुढीपाडवा ते होळीपर्यंत सर्व सण-वार-व्रत-वैकल्याची प्रात्यक्षिकासह मांढडणी असतेच पण देव्हारा कसा असावा? कुलदेवी, कुलाचार, नैवे, रांगोळी,आर्थिकप्राप्तीसाठी काय करावे ? अशा छोटया माठया गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत भगिनिंनी जेथै जेथे हा उपक्रम राबवला तेथे तेथे उत्साहवर्धक प्रतिसाद जनतेकडून लाभला. या विभागात काम करणा-या महिला सेवेक-यांनी सणवार व्रत वैकल्याबरोबर इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

मराठी अस्मिता आणि शिवराय, जिजाऊ या एकाच नाण्याच्या दोन बाजू ग्रामअभियानात, या विभागातील कार्यरत सेवेक-यांनी छत्रपती शिवरायाच्या जीवनकार्याचा अभ्यास करून तो गावक-यांपूढे ठेवावा. महिलांनी जिजाऊनी शिवरायांची केलेली जडणघडण गावातील महिलांना सांगावी.

!! कृषी विभाग !!

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे जे ग्रामअभियान हाती घेण्यात आले आहे. त्यातील एक महत्वाचा विभाग कृषी हा आहे. शेतक-यास सुखी, समृद्ध करण्यासाठी सेवामार्गातर्फे आतापर्यंत महाराष्टाच्या प्रत्येक विभागान, जिल्हयांच्या ठिकाणी तसेच लहान मोठया गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या मेळाव्यांच्या माध्यमातून लाखो शेतक-यांना त्यांच्या जिव्हाळयाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अन्नाची म्हणजे ब्रम्हाची निर्मिती करणा-या या ख-या ब्राम्हणाची दैन्यावस्था दूर करून त्याला समृद्ध बनवीन्याचे हे अभियान अधिक गतीमान करण्याची जबाबदारी अर्थातच सर्व सेवेक-यांवर आहें. ग्रामअभियानाच्या माध्यमातून आपली सेवा रूजू करणा-या सेवेक-यांनी नेमके काय करावे? असा प्रश्न संबंधित सेवेक-यांसमोर उभा राहू शकतो.

ग्रामअभियानांतर्गत काम करीत असतांना कृषी विभागाशी संबंधीत खालीलप्रमाणे कामाची दिशा ठरवून काम केल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल.

  • ग्रामअभियानासाठी आपण ज्या गावाची निवड केली आहे त्या गावातील शेतीची माहिती प्रथम एकत्रित करावी.

  • एकंदरीत गावाची आर्थिक परिस्थिती कशी आहे ? गावातील शेतकरी, शेतमजूर, व्यापरी, नोकरदार वर्ग, गावातून स्थलांतरीत झालेले मजूर, शेतिशिवाय इतर छोटे- मोठे धंदे करणारे नागरीक यांची माहिती मिळवावी.

  • गावाचे एकुण क्षेत्र, पिकाखालील क्षेत्र, पावसाचे प्रमाण, शेतीची प्रतवार वर्गवारी, पाण्याची उपलब्धता, पशूधन ही सर्व माहिती मिळवील्यास त्या दृष्टिने नियोजन करणे सोपे होईल. ही माहिती एकत्रीत केल्यावर मार्गदर्शन करणे सोपे होईल.

  • शेतक-यांना मातीचे प्रकार समजावून सांगावेत. त्यानुसार पिकांचे, पाण्याचे नियोजनाबाबत मार्गदर्शन.

  • बागायती व कोरडवाहू जमिनीत कोणती पिके घ्यावीत हे समजावून सांगणे, विशेषतः कोरडवाहू शेतक-यांना अधिक मार्गदर्शनाची गरज ओळखून ते देणे.

  • नापीक जमिनीत वनशेती, औषधी वनस्पतींची लागवड, पशूपालन, पशूनिगा याबददल माहिती, जोडधंदे व शेतक-यांच्या तरूण मुलांसाठी रोजगाराचे मार्गदर्शन.

  • उत्पन्न वाढीसाठी सेवा, विहिरीचे पाणी वाढण्यासाठी सेवा, वास्तुशास्त्रानुसार शेती रचना, श्रमदानातून बंधारे, तळे निर्मिती करणे.

  • ग्रामअभियान अंतर्गत काम करणा-या सेवेक-यांनी हे पक्के लक्षात ठेवावे की, गावातील सर्वांच्या सहभागानेच हे अभियान यशस्वी होणार असल्याने सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागणार आहे. असे झाल्यास प्रत्येक गावक-यास हे अभियान आपले वाटेल. शेतक-यांचे शेतीविषयक ज्ञान वाढावे, त्यांनी शास्त्रशुद्ध शेती करून आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरून त्यांचे व्यवस्थित संगोपण, शिक्षण करावे याच हेतूने सेवामार्र्गाच्या वतीने आतापर्यंत भारतीय कृषीशास्त्र या ग्रंथाचे दोन भाग प्रकाशित करण्यात आले आहे. शेती क्षेत्राची वाटचाल, अडथळे, विकास, कृषी क्षेत्राचे जागतिकीकरण, आध्यात्मिक शेती, शेतीविषयक मुहूर्त, वास्तुशास्त्रानुसार शेतीची रचना, यज्ञ व पर्जन्यमान, मेघ लक्षण,पर्जन्य देवता उपासना, शिवकालीन पाणी साठवण, जमिनीतील पाणी, पाणी टंचाई, पाणी प्रश्न, जलसाक्षरता, वनराई बंधारे, मृदासंधारण आयुर्वेदिक खते, गोमुत्र, शेण, गांडुळ खत, सेंद्रिय शेती, पीक संरक्षण, औषधी वनस्पतींची लागवड, फुलशेती, वनीकरण, वनौषधी, गोमाता, जनावरांची निवड, संगोपण, दग्ध व्यवसाय, मधमाशीपालन, रेशीम उदयोग, जमीन महसूल, तलाठी कार्यालय अशा शेतक-यांच्या जिव्हाळयांचे अनेक विषयांवर दिेंडारी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे भारतीय कृषीशास्त्र ग्रंथांमधून सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे. हे ग्रंथ शेतक-यांना मार्गदर्शक आहेतच पण ग्रामअभियानात काम करणा-या सेवेक-यांना सुद्धा मार्गदर्शक आहेत.

!! स्वयंरोजगार विभाग !!

स्वयंरोजगाराद्वारे शासनाचे सोपे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहचविणे तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून अत्यावश्यक गरजांना प्राधान्य देवून कमीत कमी खर्चात उदरनिर्वाह करणे याबाबत मार्गदर्शन करणे.

गाव हा विश्वाचा नकाशा । गावाहून देशाची परिक्षा । गावाची भंगता अवदशा । येईल देशा ॥

ही ओवी आहे राष्टसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील. गावाचे महत्व आपल्या साध्यासोप्या भाषेत वर्णन करतांना तुकडोजी महाराज म्हणतात की गाव ही देशाची छोटी आवृत्ती असते. म्हणजे तो देशाचा आरसाच म्हणायला हवा. गावाच्या एकंदरीत परिस्थितीवरून देशाच्या परिस्थितीबाबत अंदाज बांधता येतो. गावाची अवदशा झाली तर देशाची अवदशा झालीच म्हणून समजा. गाव भंगू दयायचे नसेल तर पर्यायाने गावाचा सर्व प्रकारे विकास घडवून आणण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

आज गावांची स्थिती काय आहे, याबाबत आपणासर्वांनाच पुरेशी कल्पना आहे व त्याबाबत अधूनमधून चर्चाही होत असते. ज्यांना रोजगार नाही, शेतीवाडी नाही त्यांचे एकवेळ समजू शकते पण वडिलांची सुपीक शेती सोडून खेडयातील युवकवर्ग शहरांकडे, महानगरांकडे धाव घेत आहेत. शहरात येवूनही त्यांचे जीवनमान फार सुधारते असे नाही. तरीही शहराकडे धाव घेण्याच्या मानसिकतेमुळे खेडी ओस पडत आहेत. गावात शेतमजूरीच्या माध्यमातून काही प्रमाणात निश्चितच रोजगार उपलब्ध होतो पण हा रोजगार स्विकारण्याची तरूणांची तयारी नाही. शहरांकडे माणसांचे लोंढे धावत असले तरी आजही निम्याहून अधिक लोकसंख्येचे वास्तव्य खेडयातच आहे. या खेडयांच्या विकासावरच तेथील लोकांचा उत्कर्ष अवलंबून आहे अर्थात निरक्षरता, अडाणीपणा खेडयांच्या अवकळेमागील एक कारण प्रमुख आहे. श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे ग्रामअभियान या पार्श्वभूमीवर आगळेवेगळे व महत्वपूर्ण वाटत आहे. या विभागात स्वयंरोजगार हा एक विभाग कार्यरत आहे. विविध महानगरात सेवामार्र्गाच्या वतीने स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरूनच बेरोजगारीच्या प्रश्नाची तीव्रता जानवते. आज बेरोजगार तरूणांचे तांडे रोजगार, नोकरी मिळेल अशा अपेक्षेने पायपीट करीत आहेत. पालकांच्या मनातली घालमेल तर विचारायलाच नको.

घरात दोनं-दोन, तीन-तीन तरूण मुल , मुली कामधंदा न करता बसुन आहेत. या मुलांचे काय होणार ? या काळजी, चिंतेपाटी पालकवर्ग अस्वस्थ आहे. ही समस्या एका कुटुंबाची नाही तर ती समाजीची, गावाची व देशाची बनली आहे. राघरात अशी अस्वस्थता वाढली तर देशाचे काय होणार ? अशी भिती मनात उभी राहणे अगदी स्वाभावीक आहे. या समस्येची तिव्रता शहरे, महानगरांप्रमाणेच, गावातही सारखीच आहे.

गावातील श्रीमंत, गरीब, नोकरदार, कलावंत, शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरूष या सर्वांनी ग्रामाोेगाच्या माध्यमातून ग्रामोद्धाराचे कार्य हाती घ्यायला हवे. गाव सर्वतोपरी समृद्ध सुखसोयीयुक्त झाले तर गावातील माणसे शहराकडे का जातील ? महात्मा गांधीनी सुद्धा अशाच समृद्ध खेडयाचे स्वप्न व त्या माध्यमातून समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले होते.

५०-६० वर्षांपूर्वी व आजची परिस्थिती खुपच वेगळी आहे. त्यावेळी गावातील चांभार, कुंभार, न्हावी, लोहार, विणकाम करणारा, सुतार आपल्या मुलांचे पोट भरून समाधानी होता पण आज काय परिस्थिती आहे ? गावातील चांभाराकडून आज त्या गावातील कुणि चप्पल घ्यायला तयार नाही, शहरातील शू मार्ट मध्ये मिळणारी आकर्षक भपकेबाज चप्पल बूट सर्वांना हवे आहेत. परिणामी खेडयातील चांभारास पोट भरणे अवघड बनले आहे. आता या उदाहरणातील दान्ही बाजुंचा विचार आपण करू.

गावात आकर्षक,रंगीबेरगी व त्यामानाने स्वस्त मिळणारी चप्पल मिळत नाही म्हणून गावातील माणूस शहरात येवून चप्पल विकत घेतो. जर गावातील चांभाराच्या मुलाने थोडे धाडस करून थोडेफार कर्ज घेवून आपल्या धांत आधुनिकता आणली तर त्याला स्वतःला रोजगार मिळेल व त्याच्या कुटुंबाचे पोट भरेल आणि त्याला पोट भरण्यासाठी शहराकडे धावावे लागणार नाही. बी-बीयाणे, शेती उदयोगाचे सामान, खेळणी, शिवणकाम, लाकुडकाम, फळे विक्री, भाजीपाला विक्री , दूध संकलन विक्री, गांडुळखत निर्मिती, विटा बनवीणे, लोखंडी खिडक्या दरवाजे बनवणे, बेदाणे, मनुके तयार करणे, मसाला धान्य दळण, मिनी ऑईल मील, पशूखा, तेलाची घाणी, शेवया पापड तयार करणे, खारे शेंगदाणे तयार करणे, पोहे, चिक्की असे कितीतरी उदयोग तरूण मुल करू शकतात.

यातून उत्पादित माल गावात अथवा शहरातही आपण विक्री करू शकतो. येथे उदाहरणादाखल फक्त काही उदयोगांचा उल्लेख केला आहे. गावातील गरज ओळखून आपण स्वतःसुद्धा काही उदयोग करू शकतो पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आळस झटकून कामाला लागावे तरच उत्कर्ष होईल. आज सरकार कुणाकुणाला नोकरी देणार ? आणि प्रत्येकाने नोकरीमागे का धावावे ? स्वयंरोजगारासाठी सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न किती तरूण करतात ? अविश्रांत श्रमाची तयारी असेल तर गावाचे नंदनवन का होणार नाही ?

श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, मालक-नोकर, शेतकरी-मजूर प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार काम केले तर गावाचा, देशाचा विकास उन्नती का होणार नाही ? मजूरांवर तर गावाची आर्थिक बाजू अवलंबून असते. मजूरांनी कामचुकारपणा केला आणि मालकांनी आळशीपणा केला तर देशाची अवस्थासुद्धा दयनीय होईल. सेवामार्गाच्या ग्रामअभियानात म्हणूनच श्रमनिष्ठा व श्रमप्रतिष्ठा वाढवण्यासाठी जनजागरण करण्याचाही प्रयत्न आहेच. ग्रामअभियानात स्वयंरोजगार विभागाचे काम जे सेवेकरी करीत असतील त्यांनी गावातील बेरोजगार युवकांची एक यादि बनवावीत्यात शिक्षण त्याची कामाबददलची अपेक्षा अशा सर्व गोष्टींची नोंद असावी. या युवकांनी दिंडोरी दरबार व श्री गुरूपीठातील स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे व त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.

!! कायदेविषयक सल्लागार विभाग !!

कायदा व सुव्यवस्था व कौटुंबिक जीवन यांचे मेळ घालणे, तसेच भगवद गितेचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना सोप्या पद्धतीत समजावून सांगणे. ग्रामअभियानाअंतर्गत संबंधीत गावात काम सुरू झाले की तेथे निश्चितच अपेक्षित बदल जाणवू लागतील. असे झाल्यास तेथीत ग्रामस्थांना निश्चितच स्वामी सेवेची गोडी लागेल. ही ग्रामस्थ मंडळी आपल्या गावात श्री स्वामी समर्थ केंद्र स्थापण्याच्या दृष्टीने विचार करू शकतात. असा विचार त्यांनी केल्यास त्यांना कायदेविषयक सल्ल्याची गरज पडेल. मार्गाचा व्याप दिवसेदिवस वाढत दिवसेंदिवस केंद्रांची संख्या वाढतच आहे. राज्य राज्याबाहेर व देशाबाहेर केंद्रांची उभारणी होत आहे. केंद्राची जागा वा इतर गोष्टींबाबत नंतर काही कायदेशीर अडचणी उभ्या राहण्याएवजी केंद्र उभारणीच्या अगोदरच या अडचणी, अडथळे दूर करणे गरजेचे आहे. यासाठी दिंडोरी दरबारतर्फे तज्ञ वकीलांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे तज्ञ आपल्याला येणा-या अडचणी दूर करून केंद्र उभारणीसाठी मदत करतील. सेवामार्गातील काम कायाच्या चौकटीतच व्हावे म्हणून हा विभाग प्रयत्नशील आहे.

ग्रामअभियानात सहभागी झालेल्या गावात केंद्र उभे करण्याचा विचार ग्रामस्थ करीत असतील तर त्या गावात आपल्या वकीलांना घेवून जावे वा तेथील प्रमुख नागरिकांसह सेवेक-यांना दिंडोरी दरबारात आणावे व पुढील नियोजन करावे.

!! आयुर्वेद विभाग !!

ग्राम अभियानातील हा एक विभाग आहे. या विभागात आयुर्वेद व आरोग्य असे दोन उपविभाग करता येतील. ५००० वर्षांपासुन आयुर्वेद हा भारतीय जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. परंतू मध्यंतरी परदेशी वैकाच्या मागे आम्ही धावलो आणि आमच्याच या प्राचिन शास्त्राचा आम्हाला विसर पडला. आम्ही इकडे ऍलोपॅथीच्या मागे धावत होतो तेव्हा अमेरिकेसारख्या प्रगत राष्टांनी आयुर्वेदावर वेगाने संशोधन करून त्याचा उपयोग आपल्या जनतेच्या स्वास्थ्य रक्षणासाठी कसा करता येईल याबाबत गांभिर्याने विचार करून या विचाराची अंमलबजावणी सुरू केली.

जेव्हा आयुर्वेदाच्या उपयुक्ततेबाबत पाश्चात्य राष्टे आम्हाला सांगू लागली तेव्हा मात्र आम्ही थोडेफार जागे झालो आणि पुन्हा आयुर्वेदाकडे वळू लागलो. आयुर्वेदास पुन्हा ते सुवर्ण युग प्राप्त व्हावे म्हणून श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सेवा मार्गाच्या वतीने धन्वंतरी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले श्री गुरूकुल पीठात अनेक दर्जेदार व अल्पावधीत लोकप्रिय झालेली आयुर्वेदिक औषधींची निर्मिती केली जाते. श्री गुरूपीठाच्या आवारातच औषधी वनस्पतींची लागवड केली जाते तसेच येथे भव्य अशा पंचकर्म चिकित्सालयाची निर्मितीही केली जाणार आहे.

ग्रामअभियानात जे सेवेकरी सक्रीय होवून गावागावात जाणार आहेत प्रथम त्यांनी सेवामार्गातर्फे आयुर्वेद-आरोग्य विभाग काय करीत आहे याची माहिती गावक-यांना दयावी. श्री स्वामी समर्थ गुरूकुल पीठावर तयार होणा-या सर्व आयुर्वेदिक औषधाची माहिती गावक-यांना दयावी. स्वास्थ्यरक्षण व आजारापासून मुक्ति मिळविण्यासाठी या औषधांची उपयुक्तता सांगावी हे सांगत असतांनाच धन्वंतरी ग्रंथातील सर्व माहिती ग्रामस्थांना दयावी. सहज व अगदी स्वस्तात मिळणा-या या वनस्पतींमध्ये मोठमोठे आजार पळवून लावण्याची ताकद आहे, हे अनुभवावरून सिद्ध झाले आहे. घराघरात मिळणा-या हळद, ओवा, चंदन, तुळस, आवळा, हिरडा, बेहडा, सुंठ अशा शेकडो घरगुती औषधांचे औषधी गुणधर्म सागून त्यांचा वापर के ल्यास आयुर्वेदाचे महत्व आपोआपच जनतेच्या लक्षात येईल. आयुर्वेद व अध्यात्माचा संबंध समजावून सांगावा. लक्ष्मीकारक वनस्पती अनिष्ट झाडे, शुभ झाडे या बाबत माहिती देणे. शेतक-यांना आयुर्वेदिक वनस्पती तसेच वनौषधींची लागवड करण्यास तयार करावे.

आयुर्वेदास जोडूनच आपला आरोग्य विभाग काम करीत आहे या विभागाने आतापर्यंत अत्यंत चांगले काम केले आहे. खेडयापाडयात तर या विभागाशी संबंधीत सेवेकरी भरीव काम करू शकतात. गावातील स्वच्छतेपासून ते वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत ग्रामस्थांना आरोग्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे गावाची स्वच्छता पाण्याची स्वच्छता आहार विहार या सह प्रत्येकाची वैयक्तिक शारीरीक स्वच्छता या बाबत मार्गदर्शनाची गरज ओळखून ते देणे. यासाठी गरज पडल्यास तज्ञांना बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित करता येईल. गावात कायमस्वरूपी, साप्ताहीक किंवा दैनिक आरोग्य तपासणी (मोफत) ची सुविधा स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने देण्याचा प्रयत्न करणे, याबरोबरच सातत्याने रक्तदान शिबीरे आयोजित करून ग्रामस्थांना तज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. आरोग्य विषयक विविध शासकीय योजना राबविल्या जातात पण जनसहभागावाचून या योजनांना अपेक्षित यश लाभत नाही. ग्रामअभियानातील सेवेक-यांनी अशा योजनांची माहिती घेवून त्याचा उपयोग आपल्या अभियानासाठी होवू शकतो का ? हे सुद्धा पडताळून पहावे.